रत्नागिरी : शहरानजीकच्या हातखंबा ते खेडशी जाणाऱ्या रस्त्यावर दोन मोटारीमध्ये धडक झाली. यामध्ये दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेंद्र सदानंद चवंडे (वय ६१), असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. २३) सायंकाळी पाचच्या सुमारास हातखंबा ते खेडशी जाणाऱ्या रस्त्यावर पानवल फाटा येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार संशयित सुरेंद्र चवंडे हे आपल्या ताब्यातील वाहन हातखंबा ते खेडशी असे चालवत नेत असताना पानवल फाट्यापुढे वाहन निष्काळजीपणे चालवून वैभव विजय वाघाटे (वय ३१) यांच्या ताब्यातील कार ला धडक देऊन अपघात केला. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल उदय वाजे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अंमलदार करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:57 PM 26/Nov/2024














