राजापूर : विविध कारणांमुळे भातशेती करण्याकडे शेतक-यांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे भातशेतीचे क्षेत्रही घटत आहे. तरीही अनेक शेतकऱ्यांनी शेती सोडलेली नाही. यंदा भातशेतीला परतीच्या पावसाचा तडाखा बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जमाखर्चाचा मेळ बसवणे अशक्य झाले आहे. नोव्हेंबर महिना संपला तरीही भातखरेदीचा दर निश्चित झालेला नाही. त्यामुळे भातशेतीच्या जमाखर्चाचा मेळ बसवायचा कसा, असा प्रश्न शेतक-यांसमोर आहे.
लहरी पाऊस, मनुष्यबळाची कमतरता, मजुरी आणि यांत्रिक साधनांचे वाढते दर आदींमुळे भातशेती तोटात जात आहे. पावसाळी हंगामात राबूनही त्या तुलनेमध्ये उत्पन्न मिळत नसल्याने अनेकांनी भातशेतीकडे पाठ फिरवली. भातशेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी भातशेती बंद केली आणि रेशन दुकानासह बाजारपेठेतून तांदूळ खरेदीला प्राधान्य दिले आहे. या स्थितीतही काही शेतकरी आजही भातशेती करताना दिसतात शेतामध्ये पिकणारे भात शासनाकडून खरेदी केली जात असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतामध्ये पिकणाऱ्या भातातून उत्पन्नही मिळते तसेच भातशेतीच्या जमाखर्चाचा मेळ बसवता येतो.
यावर्षी परतीच्या पावसाचा भातशेतीला चांगलाच तडाखा बसला आहे. अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीचा भार डोक्यावर घेऊन शेतकऱ्यांनी भातशेतीच्या कापणीची कामे उरकण्यावर भर दिला आहे. अनेक गावामधील भातकापणी पूर्ण झाली आहे. काही गावांमधील कापणीची कामे अंतिम टप्पायात दिसत आहेत. भातकापणीची कामे उरकून अनेक शेतकऱ्यांकडून अनेक वर्षभराची बेगमी मारून शिल्लक राहिलेल्या भाताची विक्री करून उत्पन्न मिळवले जात आहे मात्र यावर्षी नोव्हेंबर महिना संपत आला तीरीही भातखरेदी बाबत निणर्य झालेला नाही चाल्ग्ला दर मिळाला तर झालेले नुकसान भरून निघणार आहे त्यामधून वर्षभराची बेगमीही होते.
लहरी हवामानासह वाढत्या महागाईने आधीच भातशेती परवडत नसताना भातविक्रीतून चांगले उत्पत्र मिळते. गतवर्षीही भातखरेदीला चांगलाच दर मिळाला होता. मात्र, यावर्षी अद्यापही भात खरेदीचा निर्णय वा दर निश्चित झालेला दिसत नाही मग. भातविक्री करायची कशी आणि जमाखर्चाचा मेळ बसवायचा कसा? असा प्रश्न सतावत आहे. राजेश साळवी, शेतकरी
राजापुरात ३३ लाखांची उलाढाल
राजापूर तालुक्यामध्ये गतवर्षी राजापूर खरेदी-विक्री संघाच्या पाचल आणि राजापूर येथील केंद्रावर भात खरेदी करण्यात आली होती. त्यामध्ये सुमारे १ हजार ५२९.२० क्विंटल भाताची खरेदी होताना त्यामध्ये सुमारे ३३ लाख रुपयांची उलाढाल झाली होती. यातून शेतकऱ्यांना चांगलेच उत्पन्न मिळाले होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:38 PM 26/Nov/2024














