रत्नागिरी : रत्नागिरीतील सर्वात मोठे आणि दर्जेदार व्यावसायिक पारदर्शन म्हणून ओळख असणाऱ्या वूमेन्स कार्निव्हल चे आयोजन नववर्षातील जानेवारी महिन्यात ९ ते १२ तारखेला करण्यात येणार आहे.
कोकणातील सर्वात मोठे सुपरफास्ट न्यूज नेटवर्क असणाऱ्या रत्नागिरी खबरदार च्या माध्यमातून याचे आयोजन करण्यात येते. महिलांच्या उद्योग व्यवसायाला वृधींगत करण्यासाठी एक व्यासपीठ रत्नागिरी खबरदार च्या माध्यमातून उभे करण्यात आले आहे.
इमिटेशन ज्वेलरी पासून हिऱ्याच्या खऱ्या दागिन्यांपर्यंत अनेक आकर्षक वस्तू या प्रदर्शनात विक्रीसाठी उपलब्ध असतात. तसेच या कार्निव्हल च्या निमित्ताने फूड फेस्टीव्हल चे देखील आयोजन करण्यात येते. रत्नागिरीतील ग्राहकवर्ग याला मोठा प्रतिसाद देतो. रत्नागिरीतील ग्राहक सहकुटुंब या प्रदर्शनाला भेट देतात. या प्रदर्शनात उद्योजिका म्हणून सहभागी होण्यासाठी स्टॉल बुकिंग प्रक्रिया २८ नोव्हेंबर २०२४ पासून सुरू होणार असून याबाबतच्या अधिक माहितीसाठी ९४२११८७५७६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 27-11-2024














