किनारपट्टी भागात दव, धुक्यासह थंडी

रत्नागिरी : किनारपट्टी भागात थंडी बरोबर दवाचेही प्रमाण वाढू लागले आहे. पहाटे धुक्याचेही प्रमाण वाढले असून आंबा आणि काजू मोहरासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे.

पहाटे थंडी, सकाळी गारठा आणि सूर्यदर्शनानंतर हलका गारवा असे वातातवरण आंबा पिकाबरोबर काजूलाही पोषक असल्याचे समाधान बागायतदारांत आहे. पाऊस गेल्यानंतर आता नोव्हेंबर अखेरीस थंडीचे प्रमाण वाढू लागले आहे. हा आठवडा थंडीतील गारठ्याचा असून डिसेंबरच्या पहिला पंधरावडा थंडीचा राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाचा आहे. सध्या उत्तरेकडील शीतलहरी सक्रिय झाल्या असल्या तरी वाऱ्याचा वेग मंदावला असल्याने थंडी आटोक्यात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 27-11-2024