रत्नागिरी जिल्ह्यात पंचवार्षिक पशुगणनेला सुरुवात

रत्नागिरी : जिल्ह्यातील पंचवार्षिक पशुगणनेला सुरुवात झाली असून, २८ नोव्हेंबरपर्यंत ही मोजदाद करण्यात येणार आहे.

पशुगणना करणाऱ्या प्रगणकांना जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी, नागरिकांनी आपल्याकडे असलेली सर्व माहिती आपल्याकडे पशुगणनेसाठी येणाऱ्या प्रगणकास द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ही पशुगणना २८ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याच्या केंद्र शासनाच्या सूचना आहेत.

या गणनेसंदर्भात जिल्ह्यातील सर्व पशुसंवर्धन अधिकारी व कर्मचारी यांना सूचना व प्रशिक्षण देण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:39 27-11-2024