लांजा : अपघात प्रकरणी खासगी बस चालकावर गुन्हा

रत्नागिरी : बेदरकारपणे बस चालवून ती अपघात केल्याप्रकरणी चालकाविरोधात लांजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना सोमवार २५ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १.३० वा. मुंबई-गोवा महामार्गावरील गोवीळ गोपाळवाडी लांजा येथे घडली. असून त्यातील दोन जखमी प्रवाशांना उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कुमार अभिनव श्रीवास्तव (३३, रा.पिंपरी-चिंचवड, पुणे) आणि करिश्मा समंत्राय (३५, रा. फुरसुंगी हवेली पुणे) अशी अपघातातील दोन जखमींची नावे आहेत. तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते आपल्या कुटुंबियांसह २० नोव्हेंबर रोजी गोवा येथे फिरण्यासाठी आले होते. त्यानंतर २५ रोजी ते अन्य प्रवाशांसह आत्माराम ट्रॅव्हल्सची बसमधून इतर प्रवाशांसह गोवा ते पुणे असा प्रवास करत होते. मध्यरात्री १.३० वा. सुमारास चालकाचा बसवरील ताबा सुटल्यामुळे बस उलटून हा अपघात झाला होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:40 AM 27/Nov/2024