चिपळूण : वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, २०२० मध्ये १० मिलीयन लोकांचा कर्करोगामुळे मृत्यू झाला. त्याचवेळी, जगभरात त्याच वर्षी अंदाजे १.४१ मिलीयन लोकांना प्रोस्टेट कॅन्सर असल्याचे निदान झाले. हा जगातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात जास्त निदान होणारा कॅन्सर बनला. ४५ वयानंतर तरुणांनी याबाबत तपासणी करावी, असे ऑन्को लाईफ केअर कॅन्सर सेंटरच्या डॉ. अमोल पवार यांनी सांगितले.
जो प्रोस्टेटच्या ग्रंथी पेशींमध्ये उद्भवतो. प्रोस्टेट ग्रंथी फक्त पुरुषांमध्ये आढळते. प्रोस्टेट मूत्राशय खाली आणि गुदाशय समोर स्थित आहे. प्रोस्टेट ग्रंथीचे कार्य हे सेमिनल फ्लुइड तयार करणे आहे जे पोषणात मदत करते आणि शुक्राणूंची वाहतूक करते. कोणत्याही कॅन्सरसाठी वय हा सर्वांत सामान्य जोखीम घटक असतो. तथापि, दुर्दैवाने प्रोस्टेट कॅन्सर हा तरुणांनादेखील होऊ शकतो. अनेकदा आनुवंशिक सिंड्रोम किंवा कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्यांना कॅन्सरचं निदान लवकर व्हावे या उद्देशाने सुरुवातीपासूनच तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो.
चिपळूणचे ऑन्को लाइफ केअर कॅन्सर सेंटरचे रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट डॉ. अमोल पवार सांगतात की, स्क्रिनिंगचे महत्व समजून घेऊन नवीन तंत्रज्ञानावद्दल माहिती ठेवणे म्हणजे प्रोस्टेटची योग्य काळजी घेणे नियमित तपासणी आणि डॉक्टरांशी चर्चा करून पुरुष त्यांच्या प्रोस्टेट आरोग्याची काळजी घेऊ शकतात.
लक्षणांकडे दुर्लक्ष नको
वारंवार लघवी होणे, लघवी करताना आणि लघवी रोखताना त्रास जाणवणे लघवी करताना वेदना किंवा जळजळ होणे, इरेक्शनवेळी किंवा इजॅक्युलेशनवेळी त्रास होणे, वीर्य किंवा लघवीद्वारे रक्तस्त्राव होणे, विनाकारण वजन कमी होणे किंवा थकवा येणे अशी लक्षण आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका, असेही डॉ. पवार यांनी स्पष्ट केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:26 PM 27/Nov/2024













