चिपळूण : सह्याद्री स्कूल ऑफ आर्टच्या सुजय निवातेचा इंटरनॅशनल आर्ट कॅम्पमध्ये द्वितीय क्रमांक

सावर्डे : २६ वे कलावर्त कलापर्व इंटरनॅशनल आर्ट कॅम्प हा देशातील कला विद्यार्थ्यांसाठी ड्रॉइंग, पेंटिंग, ग्राफिक्स करिता कलावर्तन्यास या नावाने उज्जैन (मध्य प्रदेश) येथे झाला. यामध्ये सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट सावर्डे या महाविद्यालयातील तीन कला विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या कॅम्प दरम्यान झालेल्या स्पर्धेत सुजय मंगेश निवाते या विद्यार्थ्यान द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. या कॅम्पमध्ये महाविद्यालयातील सौरभ साठे या विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्मचित्रणाकरिता स्वातंत्र्यसेनानी स्व. मुकुंद सखाराम भांड विशेष पारितोषिक प्राप्त झाले. तसेच सिद्धार्थ भोवड या विद्याथ्यनिदेखील आपल्या चित्राद्वारे वेगळी छाप पाडली.

या यशस्वी विद्यार्थ्यांचे सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्यध्यक्ष व आ. शेखर निकम, संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भुवड, सेक्रेटरी महेश महाडिक, ज्येष्ठ चित्रकार, शिल्पकार प्रा. प्रकाश राजेशिर्के, पूजा निकम, कला महाविद्यालयाचे प्राचार्य माणिक यादव आदींनी अभिनंदन केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:36 PM 27/Nov/2024