खेडमधील वडगाव बुद्रुक नवीन मार्गाचा सर्व्हे करा : सार्वजनिक बांधकाम विभाग

खेड : तालुक्यातील कोतवाल धनारवाडी, सपाळवाडी ते वडगाव खुर्द, वडगाव बुद्रुक धनगरवाडी नवीन मार्गाचा सर्व्हे करा. असे आदेश राज्य शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. यासाठी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत मोरे यांनी विशेष प्रयत्न केले.

कोतवाल धनगरवाडी नवीन मार्ग व्हावा, अशी मागणी चंद्रकांत मोरे यांनी बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील कोतवाल बुद्रुक धनगरवाडी ते रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वडगाव खुर्द, वडगाव बुद्रुक या गावांना जोडणारा रस्ता झाल्यास रायगड व रत्नागिरी हे दोन जिल्हे जोडले जाणार आहेत. तसेच खेड तालुका पोलादपूर तालुक्यातील अनेक गावे या मार्गामुळे जोडली जातील. खेड, दापोली, मंडणगड, पोलादपूर तालुक्यातील जनतेची गैरसोय दूर होईल तसेच हा मार्ग पर्यायी मार्गदेखील ठरू शकणार आहे. या मार्गामुळे वडगाव खुर्द ते कोतवाल धनगरवाडी अंतर सुमारे १४ किमीने कमी होणार आहे. रसाळगड, प्रतापगढ़, महिपतगड, सुमारगड हे शिवकालीन किल्लेदेखील या परिसरात असल्याने पर्यटनाच्यादृ‌ष्टीनेदेखील याचा फायदा होणार आहे. त्यामुळे या मार्गाबाबत लक्ष घालण्याची मागणी केली होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:08 PM 27/Nov/2024