जीवन संजीवनी ही आपत्कालीन उपचार प्रक्रिया : डॉ. राजेंद्र पवार

गुहागर : जीवन संजीवनी (कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन) ही एक आपत्कालीन उपचार प्रक्रिया आहे. ही एखाद्या व्यक्तीच्या हृदयाचे ठोके बंद झाल्यावर केली जाते. या विषयी जनसामान्यांमध्ये जनजागृती करणे त्या विषयीचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे, असे डॉ. राजेंद्र पवार यांनी सांगितले.

तालुक्यातील चिखली येथील (कै.) विष्णूपंत शंकर पवार यांच्या १४ व्या स्मृतिदिनानिमित्त पवार कुटुंबीय, आयएमए चिपळूण, अपरांत हॉस्पिटल, लाईफकेअर हॉस्पिटल आणि गुहागर मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शृंगारतळी येथील पाटपन्हाळे हायस्कूलमध्ये आयोजित जीवन संजीवनी प्रशिक्षणावेळी बोलत होते. या कार्यक्रमासाठी गुहागर नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष राजेश बेडल, भाजप गुहागर तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष सुरेश सावंत, सामाजिक कार्यकर्ते महेश कोळवणकर, मंगेश जोशी यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. राजेंद्र पवार यांनी शिबीराविषयी माहिती दिली. सदर प्रशिक्षणामध्ये सर्व विद्यार्थी, डॉक्टर, वकील, पत्रकार, रिक्षाचालक, दुचाकी, चारचाकी वाहनचालक, व्यावसायिक, ग्राहक, शासकीय कर्मचारी अधिकारी शिक्षक यांचा सहभाग होता. जीवन संजीवनीमध्ये मोठ्या व्यक्तीसाठी काय करावे, यावर डॉ. रेडीज यांनी मार्गदर्शन केले आणि लहान मुलांबाबत डॉ. जोशी यांनी माहिती दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:26 PM 27/Nov/2024