देवरूख आगाराच्या व्यवस्थापकपदी रेश्मा मधाळे यांची नियुक्ती

साडवली : देवरूख आगाराच्या आगार व्यवस्थापकपदी रेश्मा मधाळे यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे. यापूर्वी त्या दापोली येथे आगार व्यवस्थापक म्हणून कार्यरत होत्या.

रेश्मा मधाळे या २०११ मध्ये कोल्हापूरमधील कागल आगारात वाहतूक निरीक्षक म्हणून एसटी महामंडळात सेवेत रुजू झाल्या. २०१६ मध्ये देवरुखात सहाय्यक अधीक्षक तर २०२० मध्ये दापोली आगारात आगार व्यवस्थापक म्हणून कार्यरत होत्या. सध्या देवरूख आगार आर्थिक तोट्यात आहे, तोटा कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून, लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:16 AM 28/Nov/2024