रत्नागिरी : खेड तालुक्यातील आयनी मेटे मोहल्ला येथे चुलत भाऊ त्याची पत्नी आणि मुलीला अज्ञात कारणातून मारहाण केल्याप्रकरणी १६ जणांविरोधात खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना सोमवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वा. घडली. प्रथमेश एकनाथ जाधव (रा. आयनी मेटे मोहल्ला खेड, रत्नागिरी) आणि इतर १५ अनोळखी जणांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात प्रकाश भागोजी जाधव (४४, रा. आयनी मेटे मोहल्ला, खेड) यांनी तक्रार दिली आहे.
त्यानुसार, सोमवारी सायंकाळी ते आपल्या घरी टीव्ही बघत असताना त्यांचा चुलत भाऊ प्रथमेश जाधव व इतर १५ संशयित त्यांच्या घरावर दगड मारत होते. तेव्हा प्रकाश जाधव यांची पत्नी लक्ष्मी जाधव (४०) हिने दरवाजा उघडून पाहिले असता संशयितांनी बांबू आणि हॉकी स्टिक घेउन त्यांच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी प्रकाश जाधव यांना बांबू आणि हॉकी स्टीकने मारहाण व शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 AM 28/Nov/2024














