देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील नवलाई देवी हेदली ग्राम मंदिराचे २५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत रोप्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हेदली मंदिर देवस्थान कमेटी आणि ग्रामस्थ यांच्यातर्फे दि. २८ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर या दिवसाच्या कालावधीत विविध धार्मिक कार्यासोबत मनोरंजनात्मक आयोजन केले आहे. कार्यक्रमाचे दि. २८ रोजी ग्रामदेवतेला रुपे लावणे, देवतेला पालखीत बसवून मंदिराभोवती प्रदक्षणा घालणे. दि. २९ रोजी सकाळी ७ वाजता नवलाई याग होमहवन दुपारी १ ते ३ महाप्रसाद, ३ ते ५ महिलांसाठी हळदी-कुंकू, सायंकाळी ५ ते ७ ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ, रात्री ९ वाजता कोकणचा बाज संगमेश्वरी साज हा मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे.
दि. २ डिसेंबर रोजी देवदीपावली साजरी केली जाणार आहे. दि. ६ डिसेंबर रोजी देवीचा गोंधळ, दि. ७ रोजी सत्यनारायणाची महापूजा, एक्का, त्या निमित्त रात्री १० वाजता भजनाचा जंगी सामना होणार आहे. दि. ८ रोजी एक्का समाप्ती तर दि. ९ रोजी सुहासिनी पूजन आणि देवींची रूपे साज उतरवणे, असे कार्यक्रम होणार आहेत. श्री नवलाई देवी मंदिर देवस्थान कमिटी आणि हेदली नवतरुण मित्र मंडळाने तालुक्यातील भक्तगणांनी या देवीच्या दर्शनाचा, महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:26 AM 28/Nov/2024














