खेड : तालुक्यातील भरणे येथील एका वडापाव सेंटरच्या बाजूला सुरू असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर पोलिस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सोमवारी सायंकाळच्या सुमारास धाड टाकून १८०० रुपयांचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी सुधीर सुरेश घाणेकर (२८) याच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो पैसे लावून मटका जुगाराचा खेळ खेळवत असल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत १८०० रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त केले. याबाबत पोलिस शिपाई कृष्णा बांगर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:32 AM 28/Nov/2024














