रत्नागिरी : देवरुख नगर पंचायतीची कोणतीही परवानगी न घेता सामाईक जागेत बांधकाम केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात देवरुख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगेश रवींद्र वैद्य, एक महिला आणि रोहित रवींद्र वैद्य (सर्व रा. देवरुख भोईवाडी ता. संगमेश्वर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तीन संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात संतोष नामदेव किर्वे यांनी तक्रार दिली आहे.
त्यानुसार अशोक शंकर वैद्य यांच्यावतीने शिशिर अशोक वैद्य यांनी १८ फेब्रुवारी २०२२ रोजी नगर पंचायत देवरुख येथे अर्जादद्वारे संशयित हे सामाईक जागेत विनापरवाना बांधकाम करत असल्याचे कळवले होते. त्यावरुन फिर्यादी संतोष किर्वे यांनी त्याठिकाणी जाउन प्रत्यक्ष पाहणी केली असता त्यांना तळमजला ७.४० मी उंची ४२,०० चौ. मी क्षेत्रफळाचे पक्क्या स्वरुपाचे दगड भिंती स्लॅब असलेले इमारतीचे विनापरवाना बांधकाम दिसून आले. त्यामुळे फिर्यादींनी पत्राद्वारे महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ५२ व ५३ अन्वये ते विनापरवाना बांधकाम एक महिन्याच्या आत काढून टाकण्याबाबत संशयितांना नोटीस दिली होती. परंतू संशयितांनी कोणतीही परवानगी न घेता हे बांधकाम पूर्ण केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:37 AM 28/Nov/2024














