सशक्त लोकशाहीसाठी संविधानाचे वाचन करा : राजेंद्र वारे

सावर्डे : भारतीय संविधान हे जगातील एक महत्त्वाचा दस्तऐवज असून, लोकशाही व लोकशक्ती याचे महत्त्व संविधानाने अधोरेखित केले आहे. भारतीय राज्यघटना स्वातंत्र्य, सार्वभौमत्व, संघराज्य एकात्मता, धर्मनिरपेक्षता व लोकशाही या महत्त्वपूर्ण बाबींवर आधारित आहे. संविधानातील हक्काबरोबरच कर्तव्याची जाणीवसुद्धा शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांमध्ये रुजण्यासाठी व सशक्त लोकशाहीसाठी संविधानाचे वाचन करणे अपेक्षित आहे, असे मत विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे यांनी व्यक्त केले.

सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शहीद दिन व संविधान दिन म्हणजेच भारतीय विधी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. २६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांविषयी विद्यार्थ्यांना अधिक माहिती मिळावी, या उद्देशाने सुधीर कदम व अशोक शितोळे यांनी तयार केलेल्या भित्तिपत्रकाचे अनावरण ज्येष्ठ शिक्षक सलीम मोडक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक उद्धव तोडकर उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:45 AM 28/Nov/2024