रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या रत्नागिरी तालुक्याचे तालुका निरीक्षक संदीप तांबेकर यांची पदोन्नती झाल्यामुळे त्या रिक्त जागेवर अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे नरेंद्र जाधव यांना सहसरव्यवस्थापकपदी बढती देण्यात आली आहे.
जाधव हे मागील अनेक वर्षे सातत्याने बँकेच्या धोरणानुसार कार्य करत असून त्यांनी विविध पदावर लक्षणीय काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या याच सहकारातील अभ्यासपूर्ण दृष्टिकोनाचा विचार करून रत्नागिरी जिल्हा बँकेने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. या निवडीनंतर जाधव यांनी सांगितले की, रत्नागिरी जिल्हा बँकेच्या उद्दिष्टानुसार बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना बँकेच्या धोरणानुसार सर्वसामान्य ग्राहक, शेतकरी यांच्यासाठी विविध कर्जयोजना, गुंतवणूक योजना राबवताना बँकेचा एनपीए कमी करून बँकेचा नफा वाढवण्यावर भर देणार असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल रत्नागिरी जिल्हा बँकेचे संचालक रामचंद्र गराटे, गजानन पाटील, अॅड. दीपक पटवर्धन, मुन्ना खामकर, जितेंद्र साळवी, भावे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 28-11-2024














