संगमेश्वर : देवरुख संगमेश्वर मार्गावरील साडवली साईनगर येथे दुचाकी भीषण अपघातात कांजीवरा येथील तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सायंकाळी ७.३० वाजता घडला. नविद युनूस कापडी (३२) असे मृत तरुणाचे नाव आहे.
नवीद हा देवरूखहून साडवलीच्या दिशेने निघाला होता. या दरम्यान साईनगर येथे गाय आडवी आल्याने तिला वाचवण्याच्या प्रयत्नात नविद याचा तोल गेला. आणि दुचाकीवरून खाली पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. त्याचा पश्चात आई, १ भाऊ, पत्नी, १ मुलगा असा परिवार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 28-11-2024














