खेड : शिवबुद्रुक भोईवाडी ते सोनारवाडी दरम्यान रेल्वे ट्रॅक शेजारी कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

खेड : कोकण रेल्वे मार्गावरील खेड रेल्वे स्थानक अंतर्गत मौजे शिवबुद्रुक भोईवाडी ते सोनारवाडी दरम्यान रेल्वे ट्रॅकच्या शेजारी मैल दगड १०६/०२ याठिकाणी सुमारे ४० ते ४५ वयाच्या अनोळखी पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे.

तालुक्यातील मौजे शिवबुद्रुक भोईवाडी ते सोनारवाडी दरम्यान रेल्वे ट्रॅकच्या शेजारी मैल दगड १०६/०२ याठिकाणी एका अनोळखी इसमाची मानवी मान व रेल्वे ट्रॅकपासून पूर्व दिशेला झाडी झुडुपामध्ये उतारात १० ते १५ मीटर अंतरावर मानेच्या खालील पायापर्यंत भाग डी कम्पोज / कुजलेल्या अवस्थेत प्रेत मिळून आलेले आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यु अशी नोंद केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:26 AM 28/Nov/2024