साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव येथील पवित्र काजळी नदीच्या शेजारी औंदुबराच्या छायेखाली असलेल्या कोंडगाव (साखरपा) येथील भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या दत्त देवस्थान कोंडगाव येथे श्रीराम कथेचे आयोजन केले आहे.
मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र यांच्या सुमारे पाचशे वर्षांनंतर झालेल्या अयोध्येतील भव्य दिव्य मंदिराच्या निर्मितीनिमित्त श्रीरामांचा समग्र जीवनपट उलगडणाऱ्या महर्षी वाल्मिकी लिखित श्रीराम कथेचे संहिता वाचन व निरूपण आदी कार्यक्रमांचे आयोजन कोंडगाव दत्त देवस्थान यांच्या वतीने कार्यक्रमांची मेजवानीच भक्तांना मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तनकर प्रवचनकार समर्थबुवा सुमंत (रामदासी) पुणे यांच्या रसाळ वाणीतून रामकथा २ ते ९ डिसेंबर २०२४ पर्यंत सायंकाळी ४ ते रात्री ८.३० वाजेपर्यंत सांगितली जाणार आहे. यावेळी त्यांना साथ देण्यासाठी संहिता मांडवगाणे, संवादिनी साथ सुशील गद्रे, तबला साथ विश्वास जोशी, ध्वनी साथ उदयराज सावंत रत्नागिरी यांची लाभणार आहे. भक्तगणांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन दत्त देवस्थान कोंडगावतर्फे करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:41 AM 28/Nov/2024














