राजापूर : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरचे नवनिर्वाचित आमदार किरण सामंत यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वीच प्राधान्याने मंजूर केलेल्या शहरातील ४ कोटी ३२ लाख रुपयांच्या ३७ विकासकामांना लवकरच प्रारंभ होणार आहे. याशिवाय इतरही विकासकामे मंजुरीच्या प्रक्रियेत आहेत.
या कामांमध्ये रानतळे रस्ता, भटाळी येथील स्व. वासुकाका जोशी पुलाचे मजबूतीकरण, भटाळी येथील रस्ता, एसटी डेपोजवळ बस स्टॉप, अनेक ठिकाणी हायमास्क, गोखले कन्याशाळा येथे शेड व खेळणी साहित्य, काही भागात रस्त्यांची रुंदीकरणे व डांबरीकरण अशा प्रमुख कामांचा समावेश आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वीच या कामांची प्रशासकीय प्रक्रिया सुरू झाली होती; मात्र आधी लोकसभेची आचारसंहिता त्यानंतर पावसाळा व पुन्हा विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता यामध्ये ही कामे मंजुरीनंतरही प्रलंबित होती. आता आचारसंहितेचा अंमल संपुष्टात आल्याने या कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. लवकरच ही ३७ कामे सुरू होत असल्याने शहरवासीय या कामांच्या पूर्ततेच्या प्रतीक्षेत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:50 AM 28/Nov/2024














