देवरुखमधील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शालेय विज्ञान प्रदर्शनास प्रारंभ

देवरुख : शहरातील न्यू इंग्लिश स्कूल येथे शालेय विज्ञान प्रदर्शन सुरू झाले आहे. विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनामध्ये ८६ प्रकल्प सादर केले आहेत. मंगळवारी सृष्टीज्ञान संस्थेचे वरिष्ठ व्यवस्थापक कुणाल अणेराव, शाळा समिती अध्यक्षा नेहा जोशी, शाळा समिती सीईओ आशिष प्रभुदेसाई आदीच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. हे प्रदर्शन बुधवारी दुपारच्या वेळेत पालकांना पहायला खुले करण्यात आले होते. या प्रदर्शनाबरोबर वैज्ञानिक आकृती रेखाटन सुमारे ३०० चित्रे, वैज्ञानिक रांगोळी प्रदर्शनात ८८ रांगोळ्या विद्यार्थ्यांनी रेखाटल्या आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे सर्जनशिलतेचे दर्शन घडणार आहे. हे प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक मधुकर कोकणी, पर्यवेक्षक अनंतकुमार मोघे, विज्ञान विभाग तसेच सर्व शिक्षक, कर्मचारी मेहनत घेत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:59 AM 28/Nov/2024