खेड : तालुक्यातील मोरवंडे-बोरज येथे ज्ञानदीप इंग्लिश मीडिअम स्कूलमध्ये ‘झेप २०२४’ हा वार्षिक स्नेहसंमेलन व विद्यार्थी गुणगौरव समारंभ ज्ञानदीप विद्या संकुल येथे पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन २४ रोजी संस्थाध्यक्ष अरविंद तोडकरी व सर्व संस्था सदस्य यांच्याहस्ते झाले. विद्यार्थी गुणगौरव सोहळा अमोल अकुलकर यांच्या हस्ते झाला. ज्ञानदीप इंग्लिश मीडिअम स्कूलमधील विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा, क्रीडा स्पर्धा, वर्ग सजावट स्पर्धा यामधील गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सरचिटणीस माधव पेठे यांनी केले व पाहुण्यांचा परिचय प्रशालेचे प्राचार्य भरत मोरे तर राजेश यांनी अहवाल सादर केला. यावेळी अमोल अकुलकर यांनी ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ करीत असलेल्या कार्याबद्दल गौरवोद्वार काढले.
आपल्या मनोगतात ते म्हणाले की, ज्ञानदीप शिक्षण संस्थेने अल्पावधीत केलेले शैक्षणिक कार्य थक्क करणारे आहे. प्रशालेच्या माध्यमातून संस्था राबवित असलेले उपक्रम कौतुकास्पद आहेत. संस्था, पालक एकत्रित येऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जे कार्य करीत आहेत. ते इतरांसाठी आदर्शवत आहेत. विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचे कौतुक करुन त्यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या, मोरवंडे गावच्या सरपंच हेमांगी काणेकर व बोरज गावचे तंटामुक्ती अध्यक्ष बाळू सनगरे यांनी आपल्या मनोगतातुन शुभेच्छा दिल्या व प्रशालेच्या यशाबद्दल कौतुक केले.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात संस्थाध्यक्ष अरविंद तोडकरी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले व संस्थेच्या प्रगतीचा आढावा उपस्थितांना सांगितला. संस्थेने सी. बी. एस. ई. स्कूल, लॉ कॉलेज, फार्मसी कॉलेज, हॉटेल मॅनेजमेंट असे विविध व्यवसायभिमुख अभ्यासक्रम सुरु केल्याचा आनंद वाटतो असे आपल्या मनोगतातुन नमूद केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. अनेक प्रकारच्या बहारदार कार्यक्रमांनी हा सोहळा रंगतदार ठरला. उत्तम नियोजन व उत्तम सादरीकरण हे या कार्यक्रमांचे वैशिष्ट्य ठरले असा अभिप्राय पालकांनी व्यक्त केला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस व ज्ञानदीप इंग्लिश मीडिअम स्कूल, सी. बी. एस. ई. शाळा व्यवस्थापन समितीचे चेअरमन माधव पेठे, संस्थेचे संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराथी, ज्ञानदीप इंग्लिश मीडिअम स्कूलच्या नियामक मंडळाचे चेअरमन प्रफुल्ल महाजन, ज्ञानदीप महाविद्यालय नियामक मंडळाचे चेअरमन व संस्थेचे विश्वस्त व जनसंपर्क अधिकारी लड्डा यांसह पालक, विद्यार्थी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:24 PM 28/Nov/2024














