खेड : ज्ञानदीप कॉलेजमध्ये पदवीदान समारंभ उत्साहात

खेड : तालुक्यातील मोरवंडे-बोरज येथे ज्ञानदीप महाविद्यालय विज्ञान व वाणिज्य मध्ये १२ वा पदवीदान समारंभ झाला. या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विनती ऑगनिकस लिमिटेड लोटेचे जनसंपर्क अधिकारी सचिन खरे उपस्थित होते.

संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी यांच्याहस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे सचिन खरे यांच्या हस्ते शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा पदवी देऊन गौरवकरण्यात आला. अध्यक्षीय भाषणामध्ये संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील हा महत्वाचा क्षण असून यापुढे विद्यार्थ्यांची जबाबदारी वाढली असून त्यांनी एक आदर्श व्यक्तिमत्व घडवण्यासाठी स्वतःला तयार करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

सूत्रसंचालन प्रा. संजोग जाधव यांनी केले. प्रास्ताविक ज्ञानदीप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय अनंत कुलकर्णी यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय व स्वागत प्रा. डॉ. उमेशकुमार बागल यांनी केले. या पदवी प्रदान समारंभासाठी संस्था सदस्य भालचंद्र कांबळे, महाविद्यालय नियामक मंडळाचे चेअरमन दीपक लड्डा, ज्ञानदीप इंग्लिश स्कूलचे प्राचार्य भारत मोरे, ज्ञानदीप औषध निर्माण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजित नगरे, ज्ञानदीप विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या अॅड. तेजस्विनी केदारे, प्राचार्य राजकुमार मगदूम, सीतारामपंत जामकर तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:34 PM 28/Nov/2024