मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसच हवेत; रत्नागिरी जिल्हा भाजप कार्यकारिणीत मागणी

रत्नागिरी : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विजयाचे शिल्पकार असून पक्षाला शंभरी पार नेणारे फडणवीस मुख्यमंत्री हवेत, अशी सर्वसामान्य कार्यकर्ते व जनतेची इच्छा आहे. असा ठराव मंगळवारी रत्नागिरीत झालेल्या जिल्हा भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला. जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी यासंदर्भात सूचना मांडली अन त्याला माजी आमदार प्रमोद जठार यांनी अनुमोदन दिले. रत्नागिरी जिल्हा भाजपा कार्यकारिणीतर्फे सदस्य नोंदणी अभियान मंगळवारी स्वयंवर मंगल कार्यालयात पार पडले. यावेळी भाजपचे कोकणचे नेते तथा मंत्री रविंद्र चव्हाण यांनी कोकणातील महायुतीच्या विजयात महत्वाची भूमिका बजावल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:44 PM 28/Nov/2024