◼️ किरण सामंतांनी अधिकाऱ्यांना आठ दिवसात काम सुरू करण्याच्या दिल्या सूचना
◼️ सकाळी नऊ वाजताच किरण सामंत ऑन फिल्डवर
◼️ सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांसहित कंपनीचे अधिकारी यांची उपस्थिती
राजापूर : लांजा राजापूर साखरपा विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार यांनी या भागामध्ये विकासाच्या कामाचा धडाका लावला असून गेली पंधरा वर्षे विकासापासून वंचित असणाऱ्या कामाबाबत किरण सामंत यांनी आढावा घेण्याचे कामाला सुरुवात केली असून आज सकाळीच नऊ वाजता त्यांनी वाटुळ येथे गेले दीड वर्ष प्रलंबित असणाऱ्या बायपासच्या कामाला भेट दिली.
वाटुळ येथे प्रलंबित असणाऱ्या बायपासचे काम गेले दीड वर्ष रडखळत पडले होते. मात्र ग्रामस्थांची अडचण लक्षात घेता येते सार्वजनिक बांधकामकारांच्या अधिकारी आणि कंपनीचे ठेकेदारांना बोलून किरण सामंत यांनी आज सकाळीच नऊ वाजता भेट देत आठ दिवसात काम सुरू करण्याचे अल्टिमेट दिले आहे. त्यामुळे गेली दीड वर्ष प्रलंबित असणाऱ्या कामाला आता गती मिळणार असून तात्काळ काम सुरू होणार असल्याचेही किरण सामंत यांनी सांगितले आहे.
किरण सामंत लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये ऍक्टिव्ह मोडवर आले असून सकाळी नऊ वाजता ऑन फिल्ड वरती त्यांनी कामाला सुरुवात केली त्यांनी सकाळी वाटुळ येथे बायपासच्या कामाला भेट दिली किरण सामंत येणार म्हणून सार्वजन बांधकाम खात्याचे अधिकाऱ्यांनी इतर अधिकारी तसेच ठेकेदार यांनी सहकार्य करणार असल्याचे सांगितले. आमदार किरण सामंत आणि अधिकाऱ्यांनी वाटुळ येथील कामाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणे केली तात्काळ काम सुरू करा असा अल्टिमेट आमदार किरण सामंत यांनी देताच अधिकाऱ्यांनी आठ दिवसात काम सुरू करू असा आश्वासन आमदार किरण सामंत यांना दिले आहे. येथील जनतेचा गांभीर याचा प्रश्न लक्षात घेता किरण सामंत यांनी मतदारसंघात पाऊल टाकतात कालपासून कामाला सुरुवात केली आहे त्यांच्या कामाची झलक अधिकाऱ्यांना माहीत असून आता लांजा राजापूर साखरपा विधानसभेमध्ये परिवर्तनाची लाट किरण सामंत यांच्या माध्यमातून येईल अशी आशा येथील मतदारांना वाटुळ लागली आहे.
यावेळी नॅशनल हायवे चे इंजिनियर कुमुवत, डेप्युटी इंजिनियर एस,एन. शिवानीवर, केसीसी कंपनीचे मॅनेजर श्री प्रकाश. यांच्यासहित विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:03 28-11-2024














