रत्नागिरी : शहरातील राजीवडा मच्छिमार्केट येथे तुफान फाईट रंगली. या परिसरात एकाला हॉकी स्टिक तसेच लोखंडी रॉडने चौघांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी चार जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीची ही घटना बुधवार 27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4.45 ते 5 वा. कालावधीत घडली आहे.
अमीर मुजावर (40), मुजफ्फर मुजावर (30), फैजान फणसोपकर (23), जमीर मुजावर (36, सर्व रा. राजीवडा, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चार संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात जखमी तरुणाच्या पत्नीने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयितांनी फिर्यादी महिलेच्या घरात घुसून तिला आणि तिचा पती अब्दुल इकबाल वस्ता (रा. भाट्ये ब्रिज राजीवडा, रत्नागिरी) या दोघांना घरात घूसून मारण्याची धमकी दिली. त्यानंतर राजीवडा मच्छिमार्केट येथे अब्दुल वस्ताची दुचाकी अडवून त्याना दुचाकीवरुन खाली ओढून हॉकी स्टिकने तसेच लोखंडी रॉडने पायांवर, डोक्यावर आणि पाठीवरती मारुन जखमी केले. या प्रकरणी चार संशयितांविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 118 (2), 351(2), 333, 189(2), 191(2), 191(3), 190 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:02 PM 28/Nov/2024














