खेड : कोकण रेल्वे मार्गावरून आठवड्यातून तीनवेळा धावणाऱ्या यशवंतपूर-कारवार एक्सप्रेसच्या डब्यांच्या संरचनेत बदल करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार ३१ जानेवारीपासून एक्सप्रेसला २ जनरल डब्यांऐवजी ४ जनरल डबे जोडण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
१६५१५/१६५१६ क्रमांकाची यशवंतपूर-कारवार एक्सप्रेसला २ विस्टाडोम, १ वातानुकूलित चेअरकार, ७ सेकंड सिटींग, २ जनरल, १ जनरेटर कार अशा १४ एलएचबी डब्यांची धावत आहे. या संरचनेत नव्या वर्षात बदल करण्यात येणार आहे. ३१ जानेवारीपासून एक्सप्रेस २ विस्टाडोम, १ वातानुकूलित चेअरकार, ३ सेकंड सिटींग, ४ जनरल, १ श्री टायर वातानुकूलित इकॉनॉमी, १ स्लीपर, १ जनरल डब्यांची धावणार आहे. परतीच्या प्रवासात १ फेब्रुवारीपासून धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:07 PM 28/Nov/2024














