दापोली : तालुक्यातील पाजपंढरी गजानन महाराज मंदिराजवळील काँक्रिट रस्त्यावर मोठा खड्डा पडला असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. तिथे अपघात होण्याची शक्यता असल्यामुळे खड्डा लवकरात लवकर बुजवा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
स्थानिक ग्रामपंचायतीवर गेले पंचवीस वर्षापेक्षा अधिक कालावधीत लोकनियुक्त प्रतिनिधी नसल्याने प्रशासकीय कारभार पाहणाऱ्या प्रशासकाचा या महत्त्वाच्या बाबीकडे दुर्लक्ष झाल्याने धोकादायक ठरणाऱ्या या वर्दळीच्या रस्त्याची सुधारणा करण्यात येत नाही. या गावामध्ये बहुसंख्य मच्छीमार समाज नौकांवर ये-जा, मासेमारी विक्री करणाऱ्या महिलांची धावपळ असल्याने या भागातील नागरिकांची वर्दळ या रस्त्याने जास्तच असते.
वाहतुकीला धोका निर्माण झालेल्या या रस्त्याची तातडीने सुधारणा करून रस्ता वाहतूकयोग्य करावा अशाप्रकारची मागणी करतानाच या रस्त्यावरून जाताना काही दुर्घटना घडलीच तर त्याची सारी जबाबदारी ही स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाची राहील, अशाप्रकारचा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे तसेच पाजपंढरी येथील रस्त्यावर सांडपाणी वाहून जाण्यासाठी पक्के सिमेंट काँक्रिटचे बांधकाम करण्यात आले आहे. त्या बांधकामावरील लोखंडी जाळी चेंबरमध्ये अडकून पडली आहे. चेंबरमध्ये पडलेली जाळी काढून ती पुन्हा व्यवस्थित बसवणे आवश्यक आहे. त्याकडेही प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:27 PM 28/Nov/2024














