राजापूर : शासनातर्फे दर पाच वर्षांनी केल्या जाणाऱ्या २१ व्या पशुगणनेला सुरुवात झाली आहे. या पशुगणनेच्या माध्यमातून पशुधनाचे नेमके चित्र स्पष्ट होणार आहे. त्याचवेळी या पशुधनाच्या संख्येच्या साहाय्याने शेतकऱ्यांसाठी पशुधनावर आधारित एखादी नवीन शासकीय योजना राबवणे वा सध्या कार्यरत असलेल्या योजनेमध्ये फेरबदल करणे अधिक सोयीचे ठरणार आहे. या पशुगणनेमध्ये गाय, म्हैस, शेळ्या, कोंबड्या यांसह अन्य पशुधनाची पशुपालकांच्या घरोघरी जाऊन ऑनलाईन पद्धतीने मोबाईलवरील अॅपद्वारे गणना केली जाणार आहे. त्यामुळे या पशुगणनेच्या मोहिमेमध्ये पारदर्शकता येऊन पशुधनाचे नेमके चित्र अधिक स्पष्ट होण्यास मदत होणार आहे.
२०१९ मध्ये झालेल्या विसाव्या पशुगणनेमध्ये राजापूर तालुक्यातील सुमारे ३० हजार पशुधन असल्याची नोंद झाली होती. २१व्या पशुगणनेसाठी पशुसंवर्धन विभाग सज्ज झाली असून, त्यासाठी ४ सुपरवायझर आणि १८ प्रगणकांची नियुक्ती केल्याची माहिती पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाचे पशुधन विकास अधिकारी डॉ. वैभव चोपडे यांनी दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:45 PM 28/Nov/2024














