क्षत्रिय मराठा मंडळातर्फे रत्नागिरीत वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन

रत्नागिरी : मराठा समाजातील तरुण-तरुणींसाठी क्षत्रिय मराठा मंडळ- मराठा सप्तपदी वधू-वर केंद्राच्या विद्यमाने वधु वर परिचय मेळाव्याचे आयोजन केले आहे. येत्या ८ डिसेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत हा मेळावा टीआरपी येथील अंबर हॉलमध्ये होणार आहे. यामध्ये वधूंना नावनोंदणी फी द्यावी लागणार नाही.

क्षत्रिय मराठा मंडळातर्फे वधु-वर परिचय मेळावा दरवर्षी आयोजित केला जातो. मराठा समाजातील विवाहेच्छुक युवक-युवती तसेच त्यांच्या पालकांना अनुरुप स्थळ शोधून विवाह जुळविण्याची सुवर्णसंधी या निमित्ताने मिळते. मराठा समाजातील ज्या स्थळानी या आधीच मंडळामध्ये आपल्या उपवर उमेद्वारांची नोंदणी केलेली आहे, तसेच ज्या स्थळांनी नोंदणी केली नसल्यास त्यांनी येताना पत्रिका, पोस्टकार्ड साईज फोटो व नोंदणी फी ५००/- भरुन मेळाव्याला उपस्थित रहावे. वधू नोंदणी साठी ही फी द्यावी लागणार नाही ही खास सवलत आहे. मराठा समाजातील सर्व पालकांनी आपल्या उपवर मुलांनी या मेळाव्यासाठी प्रत्येकी प्रवेश शुल्क १५०/- भरुन उपस्थित राहावे व मेळाव्याचा योग्य वधू-वर निवडीसाठी लाभ घ्यावा, त्यासाठी वधू-वरांची उपस्थिती आवश्यक आहे, आवाहन असे क्षत्रिय मराठा मंडळाने केले आहे. अधिक माहितीसाठी 7020357030 / 8830974065 या क्रमांकावर संपर्क साधावा.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:08 28-11-2024