भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हा सचिवपदी संदीप सुर्वे

रत्नागिरी : दक्षिण रत्नागिरी जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा सचिवपदी संदीप सुर्वे यांची निवड करण्यात आली आहे.

संदीप सुर्वे अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत.

रत्नागिरी शहरातील प्रभाग क्र. १० मधील बूथ प्रमुख, २०११ मध्ये भाजपा युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष म्हणून त्यांनी कामाला सुरवात केली. त्यानंतर नोव्हेंबर २०१९ मध्ये भाजपा रत्नागिरी शहर सरचिटणीस म्हणून काम करत होते. मागील ५ वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दर महिन्यातून एका रविवारी सादर होणाऱ्या मन की बात या उपक्रमाचे जिल्हा संयोजक म्हणून ते जबाबदारी पार पाडत होते. आता ते जिल्हा सचिव झाले आहेत.

जिल्हाध्यक्ष राजेश सावंत आणि सर्व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांचे संदीप सुर्वे यांनी मनःपूर्वक आभार मानले. आपल्यावर पक्षाने दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी प्रयत्न करणार असून यापुढे भाजपाचे संघटन मजबूत करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:07 28-11-2024