रत्नागिरी : वैभववाडी (जि. सिंधुदुर्ग) येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात २९ आणि ३० नोव्हेंबर रोजी दोन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेच्या या महाविद्यालयातील पीएम-उषा अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने Innovations and Global Perspective on Humanities, Commerce & Management and Science & Technology (मानवविद्या, वाणिज्य आणि व्यवस्थापन, विज्ञान आणि तंत्रज्ञानावरील नवकल्पना आणि जागतिक दृष्टिकोन) या विषयावरील आंतरराष्ट्रीय बहुशाखीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के २९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता परिषदेचे उद्घाटन करणार असून, कंटेंट मार्केटर आणि पत्रकार सहसंस्थापक श्रीमती शमा निमकर (यूके), वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. (डॉ.) सुवर्णा देऊसकर (ए. सी. एस. महाविद्यालय, लांजा), डॉ. मोहसीन तांबोळी ( स्कूल ऑफ एनर्जी टेक्नॉलॉजी, हैड्रोजन एनर्जी, कोरिया इन्स्टिटयूट ऑफ एनर्जी टेक्नॉल़जी, रिपब्लिक ऑफ कोरिया), डॉ. शरद पासले (ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स व सायन्स, कांदिवली, मुंबई) आणि रशियाचे वरिष्ठ व्यवस्थापक (गुणवत्ता व तांत्रिक सेवा फ्लेक्स) डॉ. टी. पी. जाधव हे या दोन दिवसांसाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष सदानंद रावराणे व कार्यकारी मंडळाचे सदस्यही परिषदेला उपस्थित राहतील. परिषदेत सहभागी होण्याचे आवाहन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व प्राचार्य, प्राध्यापक व संशोधकांना आवाहन प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:18 28-11-2024














