सुप्रसिद्ध मुर्तिकार विशाल शिंदे, मुंबई यांचे योगायोग मित्रमंडळ हातखंबा तर्फे मुर्तिकला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

हातखंबा :गेली ३४ वर्षे योगायोग मित्रमंडळ, हातखंबा हे सेवाभावी मंडळ हातखंबा पंचक्रोशी पुरती मर्यादित न राहता तालुका स्तरावरही ही अनेक सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्य अश्या क्षेत्रात उपक्रम राबवत असते. गेल्या वर्षी ही मंडळातर्फे राबवण्यात आलेल्या एकदिवसीय धनुर्विद्या प्रशिक्षण शिबिराला ही प्रशिक्षणार्थ्यांचा भरघोस असा सहभाग लाभला होता.

मंडळ या वर्षी कला क्षेत्रात पुढचे पाऊल म्हणुन मुंबई येथील मूर्तिकला क्षेत्रातील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्त्व श्री विशाल शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मूर्तिकला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करत आहेत. अनेक मुर्तिकारांचे आदर्श असलेले विशाल शिंदे यांच्या मार्गदर्शनाचा फायदा हा रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्या मधील अनेक मूर्तिकारांना होणार आहे.

सदर शिबीर हे दिनांक ५ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० ते २ या वेळेत, सिद्धगिरी मंगल कार्यालय, हातखंबा तिठा येथे संपन्न होईल. शिबिरासाठी नावनोंदणी आवश्यक असून प्रथम येणाऱ्या 300 जणांना प्रवेश मर्यादित आहेत. तरी प्रवेशाविषयी अधिक माहिती साठी मंडळाचे अध्यक्ष व मूर्तिकार योगेश मेस्त्री व मंडळाचे ज्येष्ठ सदस्य व मूर्तिकार महेश खानविलकर यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन योगायोग मित्र मंडळ हातखंबा तर्फे करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 AM 29/Nov/2024