लांजा : लांजा शहरातील शिवगंध प्रतिष्ठान लांजाच्या वतीने रविवार, दि. १ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते दुपारी १ या वेळेत संकल्प सिद्धी सभागृह लांजा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा रक्तपेढीतील असणारा रक्ताचा तुटवडा आणि रक्ताची वाढती मागणी लक्षात घेता लांजा येथील सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या शिवगंध प्रतिष्ठान या संस्थेच्यावतीने अद्वैत प्रकाश जाधव यांच्या स्मृतिप्रित्यर्थ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १ डिसेंबर रोजी लांजा शहरातील पोलीस वसाहत येथील संकल्प सिद्धी सभागृहात हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व इच्छुक रक्तदात्यांनी आगाऊ नोंदणीसाठी राजू जाधव, आदित्य कांबळे, सुमित गुरव यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन शिवगंध प्रतिष्ठान लांजा यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:42 AM 29/Nov/2024