राजापूर : तालुक्यातील ससाळे येथील श्री देव गांगेश्वर मंदिर ग्रामस्थ मंडळाच्यावतीने देवदिवाळी निमित्त २ डिसेंबर रोजी खुल्या फॅन्सी ड्रेस स्पर्धा २०२४ आयोजित केली आहे. येथील श्री देव गांगेश्वर मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी देवदिवाळी उत्सव आयोजीत केला आहे.
परिसरातील भाविक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित राहत असल्याने जत्रेचे स्वरूप येते. स्पर्धेतील प्रथम क्रमांक रोख रक्कम १० हजार व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक ५ हजार व आकर्षक चषक, तृतीय क्रमांक ३हजार व आकर्षक चषक अशी बक्षिसे दिली जाणार आहेत. याकरिता प्रवेश विनामूल्य असून प्रथम येणाऱ्या ५० स्पर्धकांना सहभाग दिला जाणार आहे. स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या स्पर्धकांनी प्रदीप हातणकर, अमित चंदुरकर, किरण गुरव, विनय शिवगण, अभिषेक राठोड, लवू शिवगण यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 AM 29/Nov/2024














