चिपळूणातील दोन कात उद्योजकांना वन विभागाचे समन्स

चिपळूण : सावर्डे परिसरातील कात कंपन्यांवर नाशिक वन विभागाने छापा टाकल्यानंतर या प्रकरणी आता चौकशी सुरू झाली आहे. याबाबत वन अधिकाऱ्यांनी दोघांना समन्स काढले आहेत. याबाबतच्या चौकशीला सामोरे जाण्याबाबत ही नोटीस बजावण्यात आल्याचे नाशिक येथील विभागीय वनाधिकारी विशाल माळी यांनी सांगितले.

गुजरात येथील ईडीच्या पत्रानंतर नाशिक वन विभागाने चिपळूण तालुक्यातील सावर्डे, दहिवली या भागातील कात कंपन्यांवर धाड टाकली. तीन कंपन्यांवर छापा टाकून तेथील कागदपत्रे, मुद्देमाल जप्त केला. यामध्ये ८० लाखांचा मुद्देमाल वन अधिकाऱ्यांनी जप्त केला आहे. खैराचा ज्यूस, बनविलेला कात या शिवाय काही कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 AM 29/Nov/2024