रत्नागिरी : उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांची विकासकामे होताना दिसत आहेत. रत्नागिरी तर आता शैक्षणिक हब देखील झाला आहे. आजच उद्योगमंत्र्यांनी एक आनंदाची बातमी संपूर्ण रत्नागिरीकरांना दिली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अखत्यारीत येणाऱ्या एमआयडीसी कडून रत्नागिरी स्मार्ट सिटी बनवण्यासाठी ४०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याबाबतची माहिती आज उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. याबाबतची निविदा देखील प्रसिद्ध करण्यात आली असून या कामांचे भूमिपूजन पुढील महिन्याच्या पाच किंवा सहा तारखेला होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. रत्नागिरी शहरातील सर्व शाळा, सर्व रस्ते, सांडपाण्याची व्यवस्था, तोरण नाला या सर्व बाबी या कामांच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातील एमआयडीसी ला लागून असणाऱ्या शाळा, पाखाड्या यांचा देखील यात समावेश करण्यात आला आहे. या ४०० कोटींच्या कामांमुळे स्पार्ट सिटी रत्नागिरी चे स्वप्न आता पूर्ण होणार आहे.