रत्नागिरी : जानेवारी २०२४ पासून आतापर्यंत मत्स्य व्यवसाय विभागाने गस्त वा अन्य प्रकरणात ९ नौकांविरुद्ध कारवाई केली आहे. एका नौकेचा परवाना एलईडी सामग्री वापरल्यामुळे रद्द केला असून बेकायदेशीर मच्छीमारी केल्याचे आढळलेल्या नौकांविरुद्ध कठोर दंडात्मक कारवाई करण्यात आली असल्याचे मत्स्य विभागाकडून सांगण्यात आले.
रत्नागिरी येथे कार्यरत असलेले तत्कालीन सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त अभय शिंदे इनामदार यांच्या कार्यकाळात म्हणजेच २०२४ या वर्षात प्रतिवेदन म्हणून ९ प्रकरणे सादर करण्यात आली होती. त्या प्रकरणी नौका मालक व अंमलबजावणी अधिकारी यांच्याकडून म्हणणे मागवून घेण्यात आले. यानंतर कारवाईचा निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये कारवाई करण्यात आलेल्यापैकी एलईडी नौकांवर प्रत्येकी पाच लाखांचा दंड आकारण्यात आला. नियमबाह्य ट्रॉलिंग केल्याप्रकरणी एका नौकेला २० हजारांचा दंड झाला. बंदी काळाचे उल्लंघन करून मासेमारी करणाऱ्या एका नौकेला २० हजारांचा दंड करण्यात आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:35 AM 29/Nov/2024














