राजापूर : केंद्र शासनाने गायीला राज्यमातेचा दर्जा दिला असून, देशी गायींचे संवर्धन होण्यासाठी गोशाळेला एका गायीसाठी एक महिन्याला दीड हजार रुपये अनुदान देण्याची योजना जाहीर केले आहे त्यासाठी पशुसंवर्धन विभागातर्फे गावांमध्ये असलेल्या गोशाळांमधील देशी गायींचे सर्वेक्षण केले जात आहे. तालुक्यामध्ये पशुसंवर्धन विभागातर्फे सर्वेक्षण केले असून, त्यामध्ये दोन गोशाळा आढळल्या आहेत. त्यामध्ये देशी प्रजातीच्या गायी असून, त्याचा सविस्तर अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात आल्याची माहिती पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली.
केंद्र शासनाने गायीला राज्यमातेचा दर्जा दिला आहे. त्याचवेळी पाच वर्षांपूर्वी राज्यामध्ये झालेल्या पशुगणनेमध्ये देशी गायींची संख्या रोडावल्याचे चित्र स्पष्ट झाले होते. त्यातून, देशी गायींचे संवर्धन होण्यासाठी गोशाळेला एका गायीसाठी एक महिन्याला दीड हजार रुपये अनुदान देण्याची योजना जाहीर केले आहे. पन्नास आणि त्यापेक्षा जास्त गायी असलेल्या गोशाळांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे. त्याचवेळी संबंधित गोशाळांची रजिस्टर नोंदणी झालेली असणे गरजेचे आहे. कोकणामध्ये गोशाळांची संख्या तुलनात्मकदृष्ट्या कमी आहे. काही मोजक्या देशी गायींच्या प्रजाती कोकणामध्ये दिसून येत असून, त्यामध्ये अलीकडील काही वर्षामध्ये येथील शेतकऱ्यांकडे अत्यंत काटक, रूबाबदार व देखण्या अशा खिल्लार या देशी प्रजातीचे बैल व गाय आढळून येत आहेत. त्यांची संख्या कमी दिसते. त्यामुळे गोमातेच्या संवर्धनासाठी देण्यात येणाऱ्या शासकीय अनुदानाचे कोकणातील लाभार्थी कमी राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भारतात ६१ प्रकारच्या देशी गायी
भारतात सुमारे ६१ प्रकारच्या देशी गायी आढळतात. प्रत्येक राज्यानुसार गायीचे वैशिष्ट्ये वेगवेगळी असून, देशातील गायींचे वर्गीकरण त्यांच्या उपयोगीतेप्रमाणे करण्यात आले असून, या प्रजाती पुढीलप्रमाणे: अमृतमहाल, आलमपाटी, कंगायम, उंबलाचेरी, ओंगल, कठाणी, कोकण कपिला, कासारगोड, काकरेज, केनकाथा, कोसली, कृष्णा, खेरीअर, खेरागढ़, खिल्लारी, गवळाऊ, गंगालिरी, गीर, डागरी, घुमुसरी, जवारी गाय, बारपारकर, चुचो, दजाल, देवणी, घत्री, नागोरी, नारी, निमारी, डांगी, पुंगनूर, पुलिकुलम, पोवार, पोडा थिरूपा, बरगुर, बद्री, बचौर, विझारपुरी, बेलाही, मलनाड गिड्डा, मासिलम, मालवी, मेवाती, मोतू, राठी, लडारखी, लखमी, लाल कंधारी, लाल पूर्णिया, लाल सिंधी, लोहानी, वेचुर, श्वेत कपिला, साहिवाल, सांचोरों, सीबी भगनारी, सिरी, हल्लीकर, हरियाणा, हिस्सार, हिमाचली पहाडी,
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:47 AM 29/Nov/2024














