रत्नागिरी : शहरातील कुवारबाव येथे जेवण करत असताना अचानकपणे बेशुद्ध पडून वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवार, २६ नोव्हेंबर रोजी रात्री ११.२३ च्या सुमारास घडली. सुधाकर श्रीधर सावंत (वय ७७, रा. सुयोग सोसायटी उत्कर्षनगर, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे.
सुधाकर सावंत हे मंगळवारी रात्री जेवण करत असताना अचानक बेशुद्ध पडले म्हणून त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना शेजाऱ्यांच्या मदतीने खासगी रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:32 29-11-2024














