बांद्रा टर्मिनस मडगाव गाडीला खेड थांबा न दिल्यास ‘रेल रोको’चा इशारा

खेड : कोकण रेल्वे मार्गावर सुरू असलेली बांद्रा टर्मिनस मडगाव या गाडीला खेड थांबा वगळण्यात आलेला आहे, त्यामुळे खेड दापोली मंडणगड या तालुक्यातील प्रवाशी या सेवेपासून वंचित राहिले आहेत, या तीन तालुक्यातील वाढता भार असताना थांबा वगळून को रे प्रवाशावर अन्याय करण्यात आला असून खेड स्थानकाला थांबा मिळण्याची मागणी येथील युवा सामाजिक कार्यकर्ते वैभव सागवेकर यांनी रेल्वे प्रशासना कडे केली आहे.

प्रत्येक वेळी गर्दीचा सामना करणे हे कोकणी प्रवाशाला वारंवार करावे लागत आहेत त्यात त्यांच्या वाट्याला कमी गाड्या मिळत असल्याने गेली अनेक वर्षे अन्याय सुरूच आहे त्यात सुरू झालेली बांद्रा टर्मिनस मडगाव ही गाडी येथील स्थानकावर थांबत नसल्याने कोकणी प्रवाशाचे हाल होत आहेत या गाडीला खेड थांबा मिळावा अशी प्रमुख मागणी असून मागणी मान्य न झाल्यास संतप्त प्रवाशी या रेल्वे प्रवाशी संघटना रेल्वे मार्गावर उतरून रेल रोको करतील, असा इशारा सागवेकर यांनी दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:35 PM 29/Nov/2024