दापोली : हर्णे समुद्रात एलईडीद्वारे मासेमारी करणाऱ्या दोन नौकांवर कारवाई

दापोली : हर्णे दाभोळ बंदरासमोर २० नॉटिकल मैल अंतरावर असणाऱ्या दोन एलईडीद्वारे अवैधरित्या मासेमारी करणाऱ्या नौका पकडल्या, मत्स्य विभागाने काल रात्री उशिरा ही कारवाई केली. दाभोळ हर्णेसमोर २० नॉटिकल मैल अंतरावर समुद्रामध्ये रायगड व रत्नागिरीतील दोन नौका एलईडीचे साहित्य वापरून मासेमारी करत असल्याचे निदर्शनास आले. सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय आनंदचालव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष संयुक्त गस्त पथकातील परवाना अधिकारी चिन्मय जोशी, पार्थ तावडे, स्वप्नील चव्हाण व सुरक्षारक्षक यांनी ही कारवाई केली या नौकांविरुद्ध २८ नोव्हेंबरला गुन्हा दाखल करण्यात आला असून, नौकेतील जनरेटर व एलईडी साहित्य जप्त करण्यात आले आहे. दोन्ही नौका जयगड बंदरात ठेवण्यात आल्या आहेत. या घटनेतील एक नौका विनित जिते व दुसरी अक्षय मजगावकर यांच्या मालकीची आहे.

हर्णे बंदरामध्ये २० नॉटिकल मैलामध्ये काही मच्छीमार बंदी असलेल्या एलईडी लाईटद्वारे मासेमारी करताना आढळून आले. त्यांच्यावर कारवाई करून साहित्य जप्त केले आहे. चिन्मय जोशी, परवाना अधिकारी, मत्स्य विभाग

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:54 AM 30/Nov/2024