लांजा : लांजा तालुक्यातील भांबेड गावचे ग्रामदैवत महालक्ष्मी देवीच्या यात्रोत्सवानिमित्त येथील तरुण मित्र मंडळ भांबेड यांच्या वतीने रविवार १ डिसेंबर रोजी राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा भांबेड गांगोबाचा माळ येथे होणार आहे. लांजा तालुक्यातील भांबेड येथे गेली ३२ वर्षे बैलगाडा शर्यती सुरू आहेत. यावर्षी स्पर्धेचे ३३ वे वर्ष असून बैलगाडा शर्यत राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय व गावस्तरीय अशा चार गटांमध्ये होणार आहे. राज्यस्तर गटामध्ये प्रथम क्रमांकास १५ हजार रु. व ढाल, द्वितीय क्रमांक १२ हजा ढाल, तृतीय क्रमांक ७ हजार व ढा यासह जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकास १० हजार रु. व ढाल, द्वितीय क्रमांक ५ हजार व ढाल, तृतीय ३ हजार व ढाल व तालुका स्तरावर प्रथम क्रमांकास ५ हजार रु. व ढाल, द्वितीय क्रमांक ३ हजार व ढाल, तृतीय २ हजार व ढाल, तर गावस्तरावर प्रथम क्रमांकास ३ हजार रु. व ढाल, द्वितीय क्रमांक २ हजार व ढाल, तृतीय १ हजार व ढाल देऊन मान्यवरांच्याहस्ते गौरवण्यात येणार आहे. या स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी चंद्रकांत गुरव, सचिन चिले यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन तरुण मित्र मंडळ भांबेड यांजकडून करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:04 AM 30/Nov/2024














