संगमेश्वर : ताम्हाने – तुळसणी मार्गालगतची झाडी धोकादायक

साडवली : संगमेश्वर तालुक्यातील ताम्हाने ते तुळसणी रस्त्यालगत वाढले व साईटपट्टीवरील वाढलेले गवत वाहतुकीस धोकादयाक ठरत आहे. संबंधित विभागाने ही धोकादायक झाडी तोडून मार्गालगतचे गवतही साफ करावे, अशी मागणी होत आहे. ताम्हाने ते तुळसणी या मार्गाला लागून अनेक गावे, शाळा जोडलेली आहेत. त्यामुळे येथून सतत वर्दळ असते. असे असताना येथील वाढलेल्या झाडीमुळे समोरून येणारे वाहन दिसत नाही. रस्त्यालगतचे वाढलेले गवत यामुळे समोरून एखादे मोठे वाहन आले तर त्याला बाजू देताना गटाराचा अंदाज येत नाही. यामुळे अपघातही घडू शकतो.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:11 AM 30/Nov/2024