संगमेश्वर ग्रामीण रुग्णालय परिसराची स्वच्छता

संगमेश्वर : केंद्र व राज्य शासनामार्फत २ ऑक्टोबरपर्यंत स्वच्छता अभियान पंधरवडा चालू आहे. त्या अंतर्गत परचुरी गावातील समाजसेवा दुदमवाडी मंडळाकडून २९ वर्षे परंपरा कायम राखत यंदा संगमेश्वर ग्रामीण रुग्णालय परिसराची स्वच्छता करण्यात आली.

स्वच्छता मोहिमेत कसबा सरपंच पूजा लाणे, नावडी सरपंच प्रज्ञा कोळवणकर, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. अभिजित मोरे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कोळवणकर, उपसरपंच विवेक शेरे, वहाब दळवी, सामाजिक कार्यकर्ते जनार्दन शिरगावकर, ग्रामविकास अधिकारी रवींद्र खंडागळे, वसंत दुदम, दिनेश दुदम, अनिल गावकर, वसंत मेस्त्री यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. स्वच्छता हीच खरी सेवा हा संत तुकडोजी महाराजांनी दिलेला स्वच्छतेचा संदेश आचरणात आणत परचुरी येथील २८ ग्रामस्थांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. हे मंडळ वर्षातून दोनवेळा स्वच्छता मोहिमेत सहभागी होते. सलग २९ वर्षे ही परंपरा चालवत आले आहेत. यावेळी श्रमदानात अनंत शिंदे, अनिल दुदम, वसंत दुदम, दिनेश दुदम, शिवाजी दुदम, शांताराम दुदम यांच्यासह ग्रामस्थांनी प्रत्यक्ष स्वच्छता केली.

स्वच्छता अभियानाचे औचित्य
केंद्र व राज्य शासनामार्फत २ ऑक्टोबरपर्यंत स्वच्छता अभियान पंधरवडा राबविण्यात येत आहे. त्याचे औचित्य साधत परचुरी गावातील समाजसेवा दुदमवाडी मंडळाकडून २९ वर्षांची परंपरा जपत संगमेश्वर ग्रामीण रुग्णालय परिसराची स्वच्छता करण्यात आली. त्यांच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांसह विविध क्षेत्रातून कौतुक होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:31 PM 26/Sep/2024