कोंडगावमधील गंजलेले, धोकादायक विद्युत पोल बदलण्याची मागणी

साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव हद्दीमध्ये अनेक विद्युत पोल गंजलेले व धोकादायक आहेत. हे पोल लवकरात लवकर बदलून मिळण्यासाठी कोंडगाव सरपंच प्रियांका जोयशी यांनी उपअभियंता महावितरण शाखा साखरपा यांना निवेदन दिले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, जोयशी वाडी ते खंडवाडी मार्गावर असलेली डीपी गांगेश्वर मंदिराजवळ बसवावी. कारण रात्री वीज खंडित झाल्यास काम करणे सोयीचे होईल. अनेक ठिकाणी पोलवर वेली, झाडे आलेली असल्याकारणाने बऱ्याच वेळा विद्युतपुरवठा खंडित होतो. त्यामुळे ही झाडे, वेली तोडून टाकाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.

हे निवेदन सादर करतेवेळी माजी उपसरपंच प्रवीण जोयशी, ग्रा. पं. सदस्य जितेंद्र जोयशी, शांताराम जोयशी, राजेंद्र सावंत, मिलिंद रांबाडे, शांताराम जोयशी, विजय जोयशी आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:24 AM 30/Nov/2024