रत्नागिरी : शहरातील आठवडा बाजार येथील सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवार २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० वा. करण्यात आली. आकिब जिकिरीया वस्ता (रा. राजिवडा, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हवालदार आशिष भालेकर यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयित हा प्रमोद महाजन क्रीडा संकुलच्या बाजूने जाणाऱ्या सार्वजनिक ठिकाणी आपल्या समोर बिअरची बॉटल घेऊन पिण्यासाठी बसलेला असताना ही कारवाई करण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:45 AM 30/Nov/2024














