राजापूर : स्वामी गगनगिरी महाराजांचे प्रमुख तपोस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या राजापूर तालुक्यातील आंगले येथील गगनगिरी मठाची वास्तू जुनी झाल्यामुळे नवीन वास्तू उभारण्याचे आंगले ग्रामस्थांनी व परिसरातील गगनगिरी भक्त मंडळींनी ठरविले. त्यानुसार नियोजित जागेचे पूजन करून नवीन आश्रमाचा पायाभरणी समारंभ नुकताच ओणी आश्रमप्रमुख नाथयोगी उल्हासगिरी महाराज यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी श्री क्षेत्र गगनगडाचे प्रमुख विश्वस्त संजयसिंह पाटणकर यांच्या हस्ते शिलापूजन सोहळा संपन्न झाला. या आश्रमासाठी स्वामी गगनगिरी महाराजांचे सदभक्त यतीश सहदेव सरवणकर हे विशेष सहकार्य करीत असून आंगले ग्रामस्थ व गगनगिरी भक्त मंडळी त्यांना सहकार्य करीत आहेत. या कार्यक्रमास आंगले गावचे रहिवासी तसेच परिसरातील ग्रामस्थ मंडळी व स्वामी गगनगिरी महाराजांची भक्त मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:52 AM 30/Nov/2024














