पावस : रत्नागिरी तालुका कृषी अधिकारी, अंतर्गत पाली येथे डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान अंतर्गत वळके, पाली, वेळवंड, कशेळी, हातखंबा, निवळी आदी परिसरातील विविध गटातील शेतकऱ्यांना रत्नागिरी तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी योजनेची रूपरेषा, उद्दिष्टे आणि महत्त्व या विषयी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. मंडल कृषी अधिकारी पाली विनायक अवेरे यांनी माती परीक्षणाचे महत्त्व या विषयी मार्गदर्शन केले. यावेळी हेगडे यांच्या हस्ते राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान महिला भाजीपाला, राष्ट्रीय खाद्यतेल अभियान व राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान कडधान्य योजनेतून वाल बियाणे, भुईमूग व मसूर बियाणे शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले. यावेळी प्र. कृषी अधिकारी रघुनाथ डवरी, राहुल पाटील यांनी मार्गदर्शन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:07 PM 30/Nov/2024













